Advertisement

धनगर आरक्षणासाठी तरुणाची आत्महत्या

प्रजापत्र | Saturday, 18/10/2025
बातमी शेअर करा

गेवराई दि.१८(प्रतिनिधी): धनगर समाजाला एसटी मधुन आरक्षण मिळत नसल्याच्या नैराश्यातून मादळमोही येथील योगेश बबन चौरे (वय ३३) यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज शनिवार (दि.१८) रोजी सकाळी घडली मयत चौरे यांच्या खिश्यात सुसाईड नोट आढळली असून त्यामध्ये आरक्षण नसल्याने आत्महत्या करत असल्याचा उल्लेख आहे. सदरील घटनेनंतर समाज बांधवांनी संताप व्यक्त करत शासनाने तातडीने धनगर समाजाला आरक्षण द्यावे अशी मागणी केली. राज्य सरकार आणखी किती बळी जाण्याची वाट पाहत आहे ? असा सवाल देखील उपस्थित करण्यात येत आहे. तहसीलदार आणि पोलीस प्रशासनाने घटनास्थळी येऊन भेट दिल्यानंतर नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेतला.
 

Advertisement

Advertisement