बीड दि.१४(प्रतिनिधी): तालुक्यातील(Beed) नाथापूर येथील ४० वर्षीय व्यक्तीने ओबीसी आरक्षण आणि मुलींना नोकरी लागते की, नाही. या विवंचनेतून शनिवार (दि.१४) रोजी रात्री आत्महत्या केल्ल्याची घटना घडली.
राज्यभरात मराठा आणि ओबीसी आरक्षणावरून आक्रमक वातावरण पाहायला मिळत असताना बीड तालुक्यातील नाथापूर गावातील गोरख नारायण देवडकर (वय ४०वर्ष) यांनी आत्महत्या केली आहे.ओबीसी आरक्षण जाणार असल्याच्या विवंचनेतून या व्यक्तीने आत्महत्येचं पाऊल उचलल्याचं त्यांच्या कुटुंबाने सांगितले. गोरख देवडकर यांना पाच मुली असून दोन मुली पोलीस भरतीची तयारी करत आहेत. मात्र सध्या राज्यातील आरक्षणाची स्थिती पाहता मुलीच्या शिक्षणाचे कसे होईल? असा प्रश्न त्यांना सतावत होता. याच विवंचनेतून त्यांनी आत्महत्या केली. जिल्हा रुग्णालयात देवडकर यांचा मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले. राज्य सरकारने आमच्या कुटुंबाचा विचार करावा अशी मागणी कुटुंबाने केली आहे.