बीड दि.८ (प्रतिनिधी): मराठवाड्यातील बंजारा समाजास हैदराबाद गॅझेटच्या आधारे अनुसूचीत जमाती एसटी आरक्षण लागू करण्यात यावे, यासाठी बंजारा समाजाची महत्वपूर्ण बैठक बीड शहरातील सौभाग्य लॉन्स येथे आज सोमवार (दि.८) रोजी संपन्न झाली.
या बैठकीला मोठ्या प्रमाणावर बंजारा बांधव उपस्थित राहिले असून हैदराबाद गॅझेटप्रमाणेच आम्हाला एसटी आरक्षण द्या, अशी मागणी उपस्थित बंजारा बांधवांनी केली. दुसरीकडे याच प्रमुख मागणीसाठी वडवणी तहसील परिसरात एकदिवसीय धरणे आंदोलन सुरू आहे.इकडे गेवराई येथेही बंजारा बांधव आंदोलनाच्या पावित्र्यात उतरल्याचे दिसून येत असून आ.विजयसिंह पंडित यांनी सदरच्या आंदोलनास पाठिंबा दर्शविला. बीड शहरातील सौभाग्य लॉन्स येथे उपस्थित समाज बांधवांना पी.टी. चव्हाण आणि बी.एम.पवार हे मार्गदर्शन करत होते.
बातमी शेअर करा