बीड दि.३(प्रतिनिधी): येथील स्वराज्य(Beed) नगरमध्ये चाकूने हल्ला करून एका २५ वर्षीय तरुणाचा खून करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. आरोपी फरार (Crime)असून शिवाजीनगर पोलीस पुढील तपास करीत आहेत.
विजय सुनील काळे (वय-२५) असे मृत तरुणाचे नाव आहे. मध्यरात्री अज्ञात व्यक्तीने विजय काळेच्या छातीवर आणि पोटावर चाकूने सपासप वार करून खून केल्याची घटना घडली आहे. सदर घटनेमागचे कारण अद्याप समजू शकले नसून शिवाजीनगर पोलीस(Police) पुढील तपास करीत आहेत.
बातमी शेअर करा