Advertisement

 ४५ वर्षीय मुजराने घेतला गळफास 

प्रजापत्र | Monday, 01/09/2025
बातमी शेअर करा

 माजलगाव दि.१(प्रतिनिधी): आजाराला कंटाळून एका ४५ वर्षीय मुजराने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार आज उघडकीस आला.  सदरील मजूर दोन दिवसांपासून बेपत्ता होता.
भानुदास एकनाथ कांबळे रा. सावरगाव, वय ४५ वर्षे या मजुराने लिव्हरच्या आजाराला कंटाळून माजलगाव कॅम्प परिसरात आत्महत्या केली. गेल्या दोन दिवसांपासून तो बेपत्ता होता. घटनास्थळी पोलीस दाखल होऊन घटनेचा पंचनामा करण्यात आला. 

 

Advertisement

Advertisement