बीड दि.३०(प्रतिनिधी): धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर एका कंटेनरने सहा जणांना चिरडले असून यातील चौघांचा जागीच मृत्यु झाला तर दोघे गंभीर जखमी झाल्याची घटना शनिवार (दि.३०)रोजी सकाळी घडली आहे.
धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील असलेल्या पेंडगाव येथे हे सहा जण दर्शनासाठी जात असताना काळाने झडप घातली असून, या भीषण अपघातात चौघांचा शनिवार (दि.३०)रोजी जागीच मृत्यु झाला आहे. जखमीं दोघांना जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान त्यांचा देखील मृत्यु झाला.
मृत तरुणाचे नावे
आकाश अर्जुन कोसळे (रा.रिलायन्स पंप परिसर,बीड ),पवन शिवाजी जगताप (रा.अंबिका चौक बीड ),किशोर गुलाब तौर (रा.बाभुळतारा ता.गेवराई),दिनेश दिलीप पवार (रा.माउली नगर बीड)
अनिकेत रोहिदास शिंदे (रा.शिदोड ता.बीड),विशाल श्रीकिसन काकडे (रा.शेकटा ता.शेगाव)