Advertisement

वृद्ध महिलेसह भाच्यावर हल्ला

प्रजापत्र | Thursday, 28/08/2025
बातमी शेअर करा

 केज दि.१८(प्रतिनिधी) : तालुक्यातील (Kaij) गप्पेवाडी येथे कौटुंबिक वादातून एका वृद्ध महिलेसह तिच्या भाच्यावर गावातील काही लोकांनी (Crime)हल्ला करत जिवे मारण्याच्या धमक्या दिल्याप्रकरणी नऊ जणांविरुद्ध केज पोलीस (Police)ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    सरस्वती सुभाष जाधवर (वय ६५) रा. गप्पेवाडी, ता. केज ह्या (दि.२४ ऑगस्ट रोजी सकाळी ८ च्या सुमारास भावाच्या घरी राहत असताना भावाची सुन मीन संतोष केदार, बाळासाहेब आसुबा केदार, बळीराम विठ्ठल केदार यांनी काही जणांना सोबत घेऊन घरासमोर येऊन त्यांना घर सोडून जाण्यास धमकावले. त्यानंतर सरस्वती जाधवर व त्यांचा भाचा दिलीप केदार यांना शिवीगाळ करून दगड व काठ्यांनी मारहाण केली.

आरडाओरडा झाल्यावर गावातील हनुमंत केदार, भीमंत केदार, आनंद शंकर केदार, बालाजी केदार यांनी धाव घेऊन भांडण सोडवले. जखमींना तत्काळ सरकारी दवाखाना, केज येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले.

या प्रकरणी मीन संतोष केदार, बाळासाहेब आसुबा केदार, बळीराम विठ्ठल केदार, अनिल राम नेहरकर, बंडु राम नेहरकर, राम शंकर नेहरकर, पांडुरंग साहेबराव केदार, विलास आसुबा केदार व आसुबा बाबु केदार यांच्याविरुद्ध केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहेत.

Advertisement

Advertisement