बीड-पोलीस अधिक्षक यांच्या आदेशावरून बीड ग्रामीण पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक बाळराजे दराडे यांनी बुधवारी (दि.२०) पहाटे वाळू वाहतूक करणारा हायवा पाठलाग करून पकडला आहे. या कारवाईत लाखोंचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
जिल्ह्यात वाळू तस्करांचे पोलिसांनी कारवाईच्या माध्यमातून कंबरडे मोडले असताना काही जण पोलिसांना चकवा देत चोरून वाळू वाहतूक करत आहेत. गेवराई पोलीस ठाणे हद्दीतून हायवा (एम. एच. 17 बी.वाय.5898) वाळू वाहतूक करून परतत असताना ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत बाळराजे दराडे यांनी तो हायवा अडविण्याचा प्रयत्न केला. यावेळी हायवा चालकाने पोलिसांना पाहताचा पळ काढला. मात्र पोलिसांनी पाठलाग करून सदर हायवा ताब्यात घेतला. याप्रकरणात भागवत पवार याच्यावर गेवराई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.
बातमी शेअर करा