Advertisement

वैद्यनाथ बँकेवर मुंडे बंधू भगिनींचे वर्चस्व

प्रजापत्र | Tuesday, 12/08/2025
बातमी शेअर करा

बीड दि.१२(प्रतिनिधी): वैद्यनाथ सहकारी बँकेच्या संचालक मंडळ निवडणुकीत मतमोजणी अखेर पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाखाली उतरलेल्या पॅनलने बाजी मारली आहे.

    वैद्यनाथ बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी परळीपासून मुंबईपर्यंतच्या ३६ मतदान केंद्रांवर शनिवारी मतदान पार पडले. एकूण ४३ हजार ९६२ मतदारसंख्येपैकी १६ हजार २८७ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला असून, एकूण मतदानाची टक्केवारी 37.5 इतकी नोंदवली गेली आहे. नेहमीपेक्षा कमी मतदान झाल्याचे या निवडणुकीत दिसून आले. या निवडणुकीत एकूण १७ जागांसाठी स्पर्धा होती. त्यापैकी चार जागा आधीच पंकजा मुंडे व धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाखालील लोकनेते गोपीनाथराव मुंडे जनसेवा पॅनलने जिंकल्या आहेत. उर्वरित १३ जागांसाठी मतदानाची प्रक्रिया पार पडली.

 

बँकेच्या १७ पैकी चार जागा बिनविरोध आल्याने उर्वरित १३ जागांसाठी मतदान झाले तर निवडणुकीत महिला मतदार संघातून डॉ. प्रीतम गोपीनाथ मुंडे, माधुरी योगेश मेनकुदळे, ओबीसी मतदार संघातून अनिल तांदळे तर अनुसूचित जाती मतदार संघातून विनोद जगतकर हे बिनविरोध आले आहेत.

Advertisement

Advertisement