Advertisement

पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या तरुणाची आत्महत्या 

प्रजापत्र | Tuesday, 12/08/2025
बातमी शेअर करा

बीड दि.१२ (प्रतिनिधी):पोलीस (Police)भरतीसह स्पर्धा परिक्षेची तयारी करणारा तरूण गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आल्याची घटना बीड बायपास रोडवरील छत्रपती संभाजी राजे चौक परिसरात आज सकाळी उघडकीस आली. 

   बीड (Beed)शहरातील बायपास रोडवरील छत्रपती संभाजी राजे चौक परिसरात असलेल्या नाईकवाडे यांच्या शेतातील झाडाला गणेश सतिश बहिरवाळ (रा.मंजेरी ता. बीड) या तरूणाचा मृतदेह गळफास लावलेल्या अवस्थेत आढळून आला. सदरील घटनेची माहिती एका ट्रक ड्रायव्हरने डायल ११२ ला कॉल करून दिली. त्यानंतर पोलीसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. मयत गणेश बहिरवाळ हा आज सकाळी रनिंगला गेला होता अशी माहिती नातेवाईकांनी दिली आहे. मयत गणेशचे दोन्ही पाय दोरीने बांधलेले असल्याने ही हत्या आहे की आत्महत्या ? असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे.

Advertisement

Advertisement