Advertisement

बीडमध्ये गावठी कट्ट्यासह एकाला पकडले

प्रजापत्र | Saturday, 09/08/2025
बातमी शेअर करा

बीड दि.९ (प्रतिनिधी): कंबरेला(Beed) गावठी कट्टा लावून सार्वजनिक ठिकाणी थांबलेल्या सागर उर्फ सनी प्रकाश मोरे (वय २४) याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीसांनी आज शनिवार (दि.९) रोजी ताब्यात घेतले असून तिघांविरुध्द बीड (Beed police) शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

 
       बीड(Beed) शहरातील खासबाग लेंडी रोडच्या उपविभागीय वन कार्यालयाच्या गेटसमोर एक इसम कंबरेला गावठी कट्टा लावून कोणाची तरी वाट पाहत थांबल्याची माहिती  स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली. पोलीसांनी तात्काळ त्याठिकाणी उभ्या असलेल्या सागर उर्फ सनी प्रकाश मोरे (वय २४ रा. खडीक्रशरच्या बाजूला, जुना धानोरा रोड, जिजाऊ नगर बीड) याला ताब्यात घेतले. यावेळी त्याच्या कंबरेला एक लोखंडी गावठी बनावटीचे ४० हजार रूपये किंमतीचे पिस्तुल मिळून आले. पोलीसांनी या पिस्तुल विषयी विचारले असता वैभव संजय वराट (रा. चक्रधर नगर बीड) व रितेश प्रभाकर बडमारे(रा. राजुरीवेस बीड) या दोघांनी दिल्याचे सनी मोरे याने सांगितले. त्यानुसार पोलीसांनी सागर उर्फ सनी गोरे, वैभव संजय बराट आणि रितेश प्रभाकर वडमारे या तिघांविरुध्द बीड शहर पोलीस ठाण्यात शनिवार (दि.९) रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरील कारवाई (Beed police) पोलीस अधिक्षक नवनीत काँवत, अप्पर पोलीस अधिक्षक सचिन पांडकर, स्थागुशाचे पोनि. शिवाजी बंटेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पथकातील पोउपनि श्रीराम खटावकर, पो. ह. विकास राठोड, आनंद म्हस्के, राहुल शिंदे, अंकुश वरपे, पोलीस अंमलदार मनोज परजणे, आशपाक सय्य्द, अर्जुन यादव, यांनी केली आहे.

 

Advertisement

Advertisement