बीड दि.१५ (प्रतिनिधी ): जनावरांची खरेदी आणि विक्री न करण्याचा निर्णय काल मंगळवार (दि.१४) जमियतुल कुरेशी समाज संघटनेच्या वतीने घेण्यात आला. जी.एन. फंक्शन हॉल या ठिकाणी बैठक घेण्यात आली. या बैठकीत हा निर्णय एकमुखीने घेण्यात आला.
जनावरांच्या विक्री आणि खरेदीच्या संदर्भात चुकीच्या पद्धतीने कारवाया होत असल्याने जनावरे खरेदी-विक्री न करण्याचा निर्णय मंगळवार (दि.१४) रोजी संघटनेच्या बैठकीमध्ये घेण्यात आला. शनिवार (दि.१९) जुलैपासून याची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. सदरील संघटनेची बैठक जी.एन. फंक्शन हॉल या ठिकाणी करण्यात आली होती.
बातमी शेअर करा