Advertisement

 चोरट्यांनी फोडले सोन्याचे दुकान 

प्रजापत्र | Friday, 11/07/2025
बातमी शेअर करा

अंमळनेर दि.११(वार्ताहर): पाटोदा (Patoda)तालुक्यातील अंमळनेर येथील अश्वलिंग या नावाने असलेले सोन्याचे दुकान बुधवार (दि.९)रोजी रात्री १ ते ५ च्या सुमारास  अज्ञात चोरट्यांनी फोडल्याची घटना घडली असून सोन्या-चांदीच्या (Crime)दागिन्यांसह एकूण १,४६,००० रुपयांचा ऐवज लंपास केला आहे.
         पाटोदा (Patoda)तालुक्यातील अंमळनेर येथील नागेश सुभाष शहाणे (वय ३६) यांच्या अश्वलिंग या नावाने असलेल्या सोन्याच्या दुकानाचे शटर तोडून काउंटर मधील सोन्या-चांदीचे दागिने लंपास केल्याची घटना बुधवार (दि.९)रोजी रात्री १ ते ५ च्या सुमारास घडली असून यामध्ये ७.५ ग्रॅमचे झुंबर किंमत ५६,००० रुपये,३ ग्रॅमचे कानातील लटकन किंमत २२,००० रुपये, १ ग्रॅमचे कानातील फुल किंमत ७,५०० रुपये,चांदीच्या एकूण (Crime)दोनश्या अंगठ्या किंमत ४४,००० रुपये,चांदीचे ५ ब्रासलेट किंमत १६,५०० रुपये असा एकूण १,४६,००० रुपयांचा ऐवज लंपास केल्या प्रकरणी नागेश शहाणे यांच्या फियादीवरून अंमळनेर पोलीस ठाण्यात गुरुवार (दि.१०)रोजी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहेत.  

 

Advertisement

Advertisement