धारूर दि.१०(प्रतिनिधी):तालुक्यातील बोडखा (कासारी) येथे (Crime)अज्ञात चोरट्यांनी घराचा दरवाजा तोडून कपाटातील सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह रोख रक्कम असा एकूण ५,३४,६०० रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना बुधवार (दि.९) रोजी घडली असून दिंद्रुड पोलीस ठाण्यात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बीड (Beed)जिल्ह्यात चोरी,घरफोडीच्या घटनेत दिवसेंदीवस वाढ होताना दिसत असून गंगाधर तुकाराम तिडके (वय ६५) रा.बोडखा (कासारी) ता.धारूर यांच्या घराच्या दरवाज्याचा कडी कोंडा रात्री २ ते ४ च्या सुमारास तोडून अज्ञात चोरट्यांनी कपाटातील सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह रोख रक्कम असा एकूण ५,३४,६०० रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना बुधवार (दि.९) रोजी घडली असून गंगाधर तिडके यांनी दिलेल्या फिर्यादीवरून(Beed police) बुधवार (दि.९)रोजी दिंद्रुड पोलीस ठाण्यात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास पोलीस करत आहेत.