धारूर दि.१० (प्रतिनिधी ): तालुक्यातील सुकळी येथील एका चौदा वर्षीय युवकाचा विहिरीत बुडून मृत्यु झाल्याची घटना मंगळवार (दि.३)रोजी घडली असून, या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.
अंकुश किसन गवळी (वय १४) हा मंगळवार (दि.३) जून रोजी दुपारी १२ च्या सुमारास गावातीलच गुणवंती तलावात मासे पकडण्यासाठी गेला होता. मात्र, तो विहिरीत पडला आणि त्यात त्याचा मृत्यु झाला, मात्र त्याला पोहायला येत नसताना सुद्धा भीमा लक्ष्मण गवळी (वय ४५) , माऊली अशोक मोरे (वय ३५, अर्जुन लक्ष्मण गवळी (वय ५२), शशिकला अशोक मोरे सर्व राहणार सुकळी ता.धारूर, यांनी मासे पकडण्यासाठी त्याला सोबत घेऊन गेले.व तलावातील बाजूलाच असलेल्या विहिरीमध्ये तो बुडाल्याने त्याचा मृत्यु झाला. मंदाकिनी किसन गवळी यांनी बुधवार (दि.९)रोजी दिलेल्या फिर्यादीवरून या चारही आरोपींविरुद्ध सिरसाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सिरसाळा पोलीस करत आहेत.

बातमी शेअर करा