Advertisement

मजुराचे काठीने फोडले डोके

प्रजापत्र | Tuesday, 08/07/2025
बातमी शेअर करा

 केज दि.८(प्रतिनिधी):शेतात (Kaij)कोळपणी करणार्‍या एका मजुराला दुपारी जेवण का करतो? तुला ५०० रूपये मजुरी दररोज देतो, असे म्हणून एका शेत मालकाने चक्क एका रोजंदारीने कोळपणी करणार्‍या मजुराच्या डोक्यात काठी मारून डोके फोडले. श्रीरंग भिमराव सानप असे जखमी शेतमजुराचे नाव आहे.

         याबाबत अधिक माहिती अशी की, केज (Kaij)तालुक्यातील देवगाव येथे श्रीरंग भिमराव सानप हा विकास नागरगोजे यांच्या शेतात रोजंदारीने सोयाबीनची कोळपणी करण्यासाठी गेले होता. दुपारी २ वाजण्याच्या सुमारास त्याने कोळपणी थांबवली. (Crime)आणि दुपारचे जेवण करण्यासाठी व बैलाला चारा पाणी करण्यासाठी गेला.
या कारणावरून विकास नागरगोजे याने शेतमजूर श्रीरंग याच्या डोक्यात काठी मारून त्याचे डोके फोडले. तसेच पाठीवर आणि पायावर काठीने मारहाण करून जिवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी श्रीरंग याने केज पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. विकास नागरगोजे याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक स्वप्नील उनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक राजू वाघमारे पुढील तपास करीत आहेत.

Advertisement

Advertisement