Advertisement

देशी दारूची विक्री करणाऱ्यावर कारवाई

प्रजापत्र | Monday, 07/07/2025
बातमी शेअर करा

बीड दि.७(पप्रतिनिधी):कॅनॉल रोडवर देशी दारू विकणार्‍या व्यक्तीस शिवाजी नगरपोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याच्याकडून ९३ दारूच्या बाटल्या ज्याची किंमत ६ हजार ३००  रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. 

कॅनॉल रोड, दिव्या बिअर शॉपीच्या समोर कैलास साहेबराव भंडारे रा.इंदिरा नगर, बीड हा व्यक्ती अवैध रित्या देशी दारूची विक्री करत होता. याची माहिती शिवाजी नगर ठाण्याचे पो.नि.सुरेश पवार यांना मिळाल्यानंतर पवार यांच्या मार्गदर्शनाखाली शिवदास घोलप, बाळू रहाडे यांनी सदरील ठिकाणी कारवाई करत देशी, विदेशी अशा ९३ दारूच्या बाटल्या ज्याची किंमत ६ हजार ३०० एवढी आहे त्या जप्त करण्यात आल्या. या प्रकरणी आरोपी विरोधात शिवाजी नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Advertisement

Advertisement