Advertisement

कंटेनरने अनेकांना उडवले

प्रजापत्र | Friday, 16/05/2025
बातमी शेअर करा

केज दि.१६(प्रतिनिधी): शहरातील शिक्षक कॉलनी ते भवानी चौकापर्यंत एका कंटेनर चालकाने अतिशय बेजबाबदारपणे कंटेनर चालवत हैदोस घातला असून चार ते पाच जणांना चिरडल्याची माहिती समोर येत आहे.यात चिंचोली माळी येथील एका महिलेचा मृत्यु झाला आहे. 
               सदरील कंटेनर चालक एवढ्यावरच थांबला नसून तसेच त्याने कंटेनर पुढे घेऊन गेला. यामध्ये रोडवरच असलेल्या चंदन सावरगाव येथेही बस स्थानकावर दोघांना चिरडले असून पुढे गेल्यानंतर लोखंडी सावरगाव मध्येही एकास धडक दिल्याची माहिती समोर आलेली आहे. सदरील कंटेनर चालक हा मद्यधुंद अवस्थेत असल्याशिवाय असे होऊ शकत नाही. मात्र केज पासून लोखंडी सावरगाव पर्यंत जाईपर्यंत त्याला थांबवणे पोलिसांनाही शक्य झालेले नसून शेवटी लोखंडी सावरगाव जवळ सदरचा कंटेनर पलटी झाला आहे असून यामध्ये चिंचोली माळी येथील एका महिलेचा मृत्यु झाला आहे.तर पाच जण जखमी झाले आहेत.अपघातातील जखमींवर केज व अंबाजोगाई येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Advertisement

Advertisement