बीड-जिल्ह्यातील पोलिसांची एकमेव पतसंस्था असलेल्या बीड जिल्हा पोलीस पतसंस्थेची निवडणूक गुरुवारी (दि. ८) बिनविरोध पार पडली. सलग तिसऱ्यांदा अध्यक्ष पदाचा बहुमान अशोक दुबाले यांना मिळाला असून मागच्या दोन टर्ममध्ये त्यांचे पतसंस्थेवरील वर्चस्व आता पुन्हा एकदा निर्विवादपणे सिद्ध झाले आहे.यावेळी उपाध्यक्ष म्हणून संघर्ष गोरे यांची फेरनिवड करण्यात आली.
पोलिसांच्या आर्थिक उन्नती आणि प्रगतीसाठी बीड जिल्हा पोलीस पतसंस्थेची १९९८ साली स्थापना करण्यात आली होती. पोलिसांना तात्काळ कर्ज देणे, आकर्षक व्याज आणि विश्वासहर्ता संपादन करण्यात या पतसंस्थेला चांगलेच यश आले आहे. केवळ पोलिसांसाठी असलेल्या या पतसंस्थेचे महिनाकाठी उलाढाल कोटीच्या घरात असून सभासदांची संख्या २ हजारांच्या पुढे आहे.सध्या या पत संस्थेत ४ कोटींच्या ठेवी असून आज या पतसंस्थेत १० टक्क्यानी कर्ज तर एफडीचा दर ९ टक्के दिला जातो.
अश्या या नावलौकिक मिळविलेल्या पतसंस्थेचा कारभार पुन्हा एकदा अशोक दुबाले यांच्या हातात आला आहे. गुरुवारी या पतसंस्थेची निवडणूक प्रक्रिया बिनविरोध पार पडल्यामुळे आता पुढील पाच वर्षासाठी या पतसंस्थेचा कारभार अध्यक्ष म्हणून अशोक दुबाले आणि उपाध्यक्ष म्हणून संघर्ष गोरे हे पाहणार आहेत. याशिवाय सलग तिसऱ्यांदा सचिव म्हणून ज्ञानेश्वर परळकर यांच्यावर जबाबदारी सोपविण्यात आली. याशिवाय संचालक मंडळात मनोज जोगदंड,मनोज वाघ,नितीन साळवे,सचिन जायभाय,संतोष म्हेत्रे,शहेनशा सय्यद,रेखा गोरे,रंजना सांगळे यांची फेरनिवड झाली आहे. विजयी सर्व उमेदवारांचे पोलीस दलाकडून अभिनंदन करण्यात येतं आहे.
चांगल्या कामाची मिळाली पावती...
अशोक दुबाले यांनी पूर्वी साडेसात वर्ष (विरोधी पॅनलला धूळ चारून) आणि आता पुन्हा एकदा पाच वर्ष (बिनविरोध ) म्हणून पतसंस्थेचा कारभार पाहणार आहेत.एकाच व्यक्तीला आणि तेही सलग तिसऱ्यांदा संधी मिळणं सोपे नसताना ही किमया साधे करणारे ते एकमेव अध्यक्ष ठरले आहेत. स्थानिक गुन्हे शाखेत काम करताना असेल किंवा पोलीस पतसंस्थेचे अध्यक्ष म्हणून कारभार पाहताना कायम प्रामाणिक पणा आणि व्यापक दृष्टीने त्यांनी निर्णय घेतल्यामुळे २ हजार सदस्यांनी पुन्हा एकदा त्यांना संधी देतं चांगल्या कामाची एक प्रकारे पावतीच दिली आहे अस म्हणायला हरकत नाही.
सर्व पदाधिकारी व सदस्यांना विजयी समर्पित-दुबाले
बीड जिल्हा पोलीस पतसंस्थेच्या अध्यक्षपदी हॅट्रिक झाली असली तरी मागच्या दोन टर्म मध्ये पोलिसांचे प्रश्न,त्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी कायम तत्परता दाखविली आहे.मागच्या काळातील काम, संचालक मंडळाचा विश्वास, सदस्यांनी दाखविलेल्या प्रेमामुळे आजची लढाई एकतर्फी झालेली असून आजचा विजय खऱ्या अर्थाने सर्व पदाधिकारी व सदस्यांना समर्पित आहे.