Advertisement

माजलगावमध्ये खुनाचे सत्र सुरूच

प्रजापत्र | Sunday, 04/05/2025
बातमी शेअर करा

माजलगाव दि.४ (प्रतिनिधी): मागच्या (Majalgaon) महिनाभरापासून माजलगावमध्ये भरदिवसा होत असलेले खुनाचे सत्र अजूनही सुरूच आहे.कायदा आणि सुवस्थेचे रान उठविणाऱ्या आ.प्रकाश सोळंके यांच्या मतदारसंघात ही तिसरी हत्या समोर आली आहे.(Crime news)माजलगाव शहराजवळील खानापूर येथे बापानेच मुलाला जीवे मारले असून या घटनेमुळे खळबळ उडाली.

      रोहित गोपाळ कांबळे असे मयताचे नाव आहे.तर त्याचा बाप गोपाळ विठ्ठल कांबळे हा (Crime news)आरोपी असून त्याने आपल्या पोटच्या मुलालाच संपविले आहे.दारू आणण्याच्या कारणावरून या दोघांमध्ये नेहमीच कुरबुरी व्हायच्या. आठ दिवसांपुर्वीच रोहीत कांबळे याने गळफास घेऊन आत्महत्येचा देखील प्रयत्न केला होता. रविवारी (दि.४) सकाळी दोघेही दारूच्या नशेत असतानाच पुन्हा त्यांच्यात कुरबूर झाली. यावेळी बापाने जवळच पडलेला लाकडी बांबू डोक्यात घालून त्याचा खून केला.घटनास्थळी माजलगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राहूल सुर्यतळ, (Majalgaon)पोलीस पोउपनि आकाश माकणे व इतर पोलीस कर्मचारी उपस्थित होते. त्यांनी घटनास्थळाचा पंचनामा करून प्रेत उत्तरीय तपासणीसाठी माजलगाव ग्रामीण रुग्णालयात पाठवले आहे. आरोपीला पोलीसांनी घटनास्थळाहून अटक केली आहे.

Advertisement

Advertisement