Advertisement

जंतर-मंतरवर सीजेपी (CJP) नेत्यांचे आंदोलन

प्रजापत्र | Tuesday, 13/10/2026
बातमी शेअर करा

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आणि 'एसआयआर' (SIR) प्रक्रियेला विरोध करण्यासाठी दिल्लीतील जंतर-मंतरवर आंदोलन करणाऱ्या 'कॉकरोच जनता पार्टी'च्या (CJP) नेत्यांवर पोलिसांनी कारवाई केली आहे. पक्षाचे प्रवक्ते सौरव दास आणि आशुतोष रांका यांना समर्थकांसह घोषणाबाजी करताना पोलिसांनी ताब्यात घेतले.

 

जंतर-मंतरवर आंदोलनास बंदी: केंद्र सरकारने एक मोठा निर्णय घेत 'जंतर-मंतर'ला अधिकृत आंदोलन स्थळांच्या यादीतून वगळले आहे. गृह मंत्रालयाच्या समितीनुसार, आता केवळ रामलीला मैदान, बुराडी मैदान आणि सीबीडी (CBD) मैदान येथेच आंदोलनास परवानगी असेल.

सीजेपीचा इशारा:ताब्यात घेतल्यानंतर आशुतोष रांका यांनी व्हिडिओद्वारे सरकारला इशारा दिला आहे की, जोपर्यंत ज्ञानेश कुमार राजीनामा देत नाहीत, तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील. आज १० जण असले तरी उद्या हजारो लोक रस्त्यावर उतरतील.

दोन दिवसांपूर्वीच झाली होती सुटका:दास आणि रांका यांना सीजेपीचे संस्थापक अभिजीत दीपके यांच्यासह १० ऑक्टोबरला विमानातून ताब्यात घेण्यात आले होते. त्यानंतर त्यांना प्रत्येकी ५० हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर आणि वर्षभर शांतता राखण्याच्या अटीवर नुकतेच सोडण्यात आले होते.

 

मुख्य निवडणूक आयुक्तांना सीजेपीचा विरोध का?

सीजेपीने ज्ञानेश कुमार यांच्यावर प्रामुख्याने चार आक्षेप घेतले आहेत:

१. SIR प्रक्रियेवर आक्षेप:इतर दोन निवडणूक आयुक्तांनी (सुखबीर सिंग संधू आणि विवेक जोशी) गेल्या १० महिन्यांत SIR संदर्भातील निर्णयांवर १४ वेळा आक्षेप नोंदवले आहेत.

२.मतदार यादीतील त्रुटी:मतदार यादीत नावे समाविष्ट करणे व वगळण्याच्या प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह.

३.फॉर्म-६ मधील बदल:फॉर्म-६ मध्ये SIR शी संबंधित प्रश्न टाकण्यावर आयुक्तांचा विरोध होता.

४.डेटा सुरक्षेची चिंता:निवडणूक डेटा आणि सॉफ्टवेअरच्या वापराबाबत आयुक्तांनी थेट कॅबिनेट सचिवांना पत्र लिहून चिंता व्यक्त केली होती.

 

यापूर्वी सीजेपीने 'नीट' (NEET) पेपरफुटी प्रकरणी २० जून ते २५ जुलै असे ३६ दिवस तीव्र आंदोलन केले होते. या आंदोलनात सोनम वांगचुक यांनीही उपोषण केले होते, ज्याचा परिणाम म्हणून तत्कालीन शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांना राजीनामा द्यावा लागला होता.

Advertisement

Advertisement