Advertisement

खुणे मारहाणप्रकरणात आरोपींची धरपकड सुरु

प्रजापत्र | Monday, 12/10/2026
बातमी शेअर करा

बीड-येथील ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पाली येथे मंदिरात दर्शनासाठी आलेल्या अमोल खुने त्यांचे सहकारी व अन्य एकाला जमावाकडून बेदम मारहाण केल्याचा प्रकार समोर आला होता.याप्रकरणी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केल्यानंतर यातील तीन आरोपींना अखेर पोलिसांनी गजाआड केले आहे.तीनही आरोपी बीड तालुक्यातील मौजवाडी येथील रहिवाशी आहेत.
   रविवारी (दि.११) अमोल खुणे आपल्या सहकाऱ्यासोबतच पाली येथे एका मंदिरात दर्शनासाठी आले होते.यावेळी दुपारच्या सुमारास तुळजापूरवरून देवीची ज्योत घेऊन आलेल्या एका जमावाने मंदिरात खुणेला पाहिल्यानंतर मंदिरात जाऊन दरवाजा लावून घेत मारहाण केली.यावेळी अमोल खुणेसह,गणेश खुणे,  विजय गुरखुदे या तिघांना लाकडी दांडके,लोखंडी पाईपने मारहाण केल्याने खळबळ उडाली.घटनेचे गांभीर्य पाहता अप्पर पोलीस अधिक्षक समीर शेख यांच्यासह ग्रामीण पोलिसांनी तात्काळ धाव घेऊन भेट दिली.यावेळी घटनास्थळाचा पंचनामा करत गुन्हा दाखल करण्यात आला.यावेळी अमोल खुणे यांनी आपल्या जीवे मारण्याची सुपारी दिल्याचा आरोप मनोज जरांगे यांच्यावर आरोप केला.दरम्यान जखमींवर बीडच्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असून बीड ग्रामीण पोलिसांनी या प्रकरणातील तिघांच्या मुसक्या आवळल्या आहेत.आरोपी करण बंडू ढेंगे,धोंडीराम सर्जेराव चव्हाण आणि वैभव अशोक ढेंगे असे त्यांचे नावे असून तिघेही मौजेवाडीचे रहिवाशी आहेत.या घटनेचा तपास बीड ग्रामीण पोलीस करत आहेत.

 

Advertisement

Advertisement