दिल्ली : निवडणूक आयोगाने देशातील पाच प्रमुख राज्यांमध्ये मतदार याद्या अधिक अचूक आणि अद्ययावत करण्यासाठी 'विशेष गहन पुनरीक्षण' मोहीम सुरू केली आहे. महाराष्ट्र, दिल्ली, कर्नाटक, मेघालय आणि झारखंड या राज्यांमध्ये आज, ३० जूनपासून या प्रक्रियेला अधिकृतपणे सुरुवात होत आहे. या मोहिमेचा मुख्य उद्देश मतदार याद्यांमधील त्रुटी दूर करणे, दुबार किंवा मृत मतदारांची नावे यादीतून वगळणे आणि पात्र नागरिकांचा समावेश करणे हा आहे.
निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार, सर्व संबंधित मतदान केंद्रांवर नियुक्त केलेले बूथ लेव्हल अधिकारी (BLO) २९ जुलैपर्यंत आपापल्या भागातील घराघरांमध्ये प्रत्यक्ष जाऊन मतदारांची माहिती गोळा करतील. यादरम्यान नवीन मतदारांची नोंदणी, पत्त्यामधील बदल आणि नावातील दुरुस्ती यांसारखी कामे जागेवरच केली जातींल. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या पाचही राज्यांमधील मतदार याद्यांचे हे पुनरीक्षण अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहे. निवडणूक आयोगाने नागरिकांना आवाहन केले आहे की, त्यांच्या भागात येणाऱ्या बीएलओ अधिकाऱ्यांना अचूक माहिती देऊन या प्रक्रियेत सहकार्य करावे, जेणेकरून एकही पात्र मतदार मतदानापासून वंचित राहणार नाही.
महाराष्ट्र, दिल्ली, कर्नाटक, मेघालय आणि झारखंड या पाच राज्यांमध्ये आजपासून (३० जून) मतदार याद्यांच्या विशेष आणि सखोल दुरुस्ती प्रक्रियेला सुरुवात होत आहे. या प्रक्रियेत बीएलओंचा घर-घर दौरा असणार आहे. या मोहिमेअंतर्गत बूथ लेव्हल अधिकारी (BLO) २९ जुलैपर्यंत प्रत्येक घराला भेट देऊन मतदारांचे प्रत्यक्ष पडताळणी करणार.या दुरुस्ती प्रक्रियेदरम्यान मतदाराची ओळख पटवण्यासाठी 'पासपोर्ट' हा वैध दस्तऐवज म्हणून ग्राह्य धरला जाईल, असे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे.
नवीन मतदारांना संधी: या मोहिमेमुळे अपात्र मतदारांची नावे वगळणे आणि पात्र व नवीन मतदारांची नावे नोंदवणे सोपे होणार आहे.

