नेकनूर दि.१५ (वार्ताहार): वैतागवाडी येथील अशोक महादेव डिसले या तरुण शेतकऱ्याने नापिकी कर्जबाजारीपणा व मराठा आरक्षण आंदोलनातील गुन्ह्याचा तगादा,कोर्ट कचेरीचा त्रास, गुन्हा दाखल होऊनही कुणबी प्रमाणपत्र न मिळाल्याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.
आरक्षण आंदोलनातील गुन्हे दाखल झाल्यामुळे अनेक तरुणांचे आयुष्य उध्वस्त झाले आहे.सरकारने गुन्हे मागे घेतो असे आश्वासन दिले होते मात्र गुन्हे मागे न घेतल्याने व कोर्टकचेरीचा तगादा, त्याच आर्थिक अडचण यामुळे अशोक याने आत्महत्या सारखे टोकाचे पाऊल उचलल्याचे नातेवाईकांनी सांगितले. जोपर्यंत गुन्हे मागे घेण्यासंदर्भात निर्णय होत नाही तोपर्यंत प्रेत ताब्यात घेतले जाणार नाही असा इशारा नातेवाईकांनी दिला आहे.
मराठा आरक्षण आंदोलनात सक्रिय सहभागी असलेल्या तरुण शेतकऱ्याने आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. आंदोलनातील गुन्हे मागे न घेतल्याने अनेक तरुण हे तणावामध्ये आहेत. गुन्हे मागे घेण्यासंदर्भात तात्काळ सरकारने निर्णय घ्यावा अशी मागणी मराठा आरक्षण समन्वयक गंगाधर काळकुटे यांनी केली आहे.
- गंगाधर काळकुटे (मराठा आरक्षण समन्वयक)

