Advertisement

दुचाकी आडवी लावून लूटणारे जेरबंद

प्रजापत्र | Friday, 05/12/2025
बातमी शेअर करा

अंबाजोगाई दि.५ (प्रतिनिधी):पोखरी रोडवर दुचाकी आडवी लावून जबरदस्तीने मोबाईल हिसकावून पळ काढणाऱ्या दोघांना गुरुवार (दि.४) रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अंबाजोगाई येथून जेरबंद केले असून आरोपींकडून दोन गुन्हे उघडकीस आणले आहेत. 

    सदरील आरोपी अंबाजोगाई येथील त्याच्या घरासमोर उभा असल्याची खात्रीलायक माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाल्यानंतर सदरील ठिकाणी जावून त्यास गुरुवार (दि.४) रोजी ताब्यात घेतले व त्याचे नांव गांव विचारले असता तो विधीसंघर्ष बालक असल्याचे निदर्शनास आले. त्यास सदरील गुन्हा करते वेळी सोबत कोण होते विचारले असता त्याने सदरील गुन्हा रितेश चव्हाण (सध्या सांगली जिल्हयामध्ये खुनाचे गुन्हात अटक आहे असे दोघांनी मिळून केल्याचे कबुल केले आहे. विधीसंघर्षग्रस्त बालकाने त्याचे जवळील मोबाईल हा नमुद गुन्हयातील असल्याचे सांगीतले. तसेच त्याच्याकडे असलेल्या दुचाकीचे कागदपत्रे विचारले असता त्यानी सदरील दुचाकी अंबाजोगाई परीसरात चोरल्याचे सांगीतले. त्याच्याकडील मोबाईल व दुचाकी जप्त करण्यात आली असुन सदरील मुद्देमाल पुढील तपासकामी पोलीस ठाणे अंबाजोगाई शहर यांच्या ताब्यात देण्यात आले आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाने एक जबरी चोरी व मोटार सायकल चोरी असे दोन गुन्हे उघडकीस आणले आहेत.सदरील कामगिरी नवनित कॉंवत, पोलीस अधीक्षक,चेतना तिडके अपर पोलीस अधीक्षक अंबाजोगाई, शिवाजी बंटेवाड, स्थानिक गुन्हे शाखा, बीड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुशांत सुतळे, पोलीस हवालदार मारोती कांबळे, रामचंद्र केकान, विष्णु सानप, सचिन आंधळे, विकी सुरवसे, चालक पोलीस अंमलदार अतुल हराळे यांनी केली. 

Advertisement

Advertisement