Advertisement

कार-दुचाकीच्या अपघातात बापलेक गंभीर

प्रजापत्र | Saturday, 15/11/2025
बातमी शेअर करा

 नांदुरघाट दि.१५ (वार्ताहर): केज-नांदूरघाट रोडवर असलेल्या महावितरणच्या ३३ केव्ही केंद्राच्या समोर दुचाकी आणि अल्टो कारची समोरासमोर धडक होऊन अपघात झाल्याची घटना (दि.१५) नोव्हेंबर रोजी दुपारी ४ च्या सुमारास घडली आहे. यामध्ये दुचाकीवरील बाप-लेक गंभीर असून त्यांना पुढील उपचारासाठी अंबाजोगाई येथील शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
     केज-नांदुरघाट रोडवर अल्टो गाडीतून (एमएच २४ पी. ४००१)  रणजित हनुमंत गवळी हे शिरूरघाट वरून नांदुरघाटकडे जात होते. तर केजकडे दुचाकीवरून (एमएच २८ बी.पी.१५९४) संतोष राजा काळे (वय ३०) आणि विशाल संतोष काळे हे बापलेक केजकडे निघाले होते. परंतु कारची आणि दुचाकीची  नांदुरघाट येथे  महावितरणच्या ३३ केव्ही केंद्राच्या समोर मोठी धडक झाली. या अपघातमध्ये दुचाकीवरील दोघे गंभीररीत्या जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी नांदुरघाट ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र त्यांची स्थिती चिंताजनक असल्याने त्यांना तात्काळ अंबाजोगाई येथील शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले आहे. तर अल्टो कारमधील रणजित हनुमंत गवळी यांच्यावर नांदुरघाट येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

Advertisement

Advertisement