शिरूर कासार दि.३१ (प्रतिनिधी):तालुक्यातील(Shirur kasar) शिरापूर धुमाळ येथे अज्ञात चोरट्यांनी घरात घुसून कपाटातील सोन्याच्या दागिन्यांसह रोख रक्कम (Crime)असा एकूण ३,०४,००० रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना गुरुवार (दि.३०) रोजी भरदिवसा घडली.
मागील काही दिवसांपासून जिल्हाभरात (Beed)चोरीच्या घटनेत वाढ होताना दिसत आहे. अश्यातच शिरूर कासार तालुक्यातील शिरापूर धुमाळ येथील बाळासाहेब लक्ष्मण बहिर (वय ४२) हे आपल्या कुटुबांसोबत शेतात कापूस वेचण्यासाठी जात असताना घाई गडबडीत घराला कुलूप लावण्याचे विसरले असता अज्ञात चोरट्यांनी घरात घुसून कपाटातील ३० ग्रॅमचे गंठण, ६ ग्रॅमचे झुंबर,५ ग्रॅमचे वेल, कपाटातील रोख रक्कम ५०,००० रुपये असा एकूण ३,०४,००० रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना गुरुवार (दि.३०) रोजी ११.३० ते १.३० च्या सुमारासत (Crime)भरदिवसा घडली असून बाळासाहेब बहिर यांच्या फिर्यादीवरून पाटोदा पोलीस ठाण्यात गुन्हा करण्यात आला असून या घटनेचा तपास सपोनि.श्री.तागड हे तपास करत आहेत.

बातमी शेअर करा
