Advertisement

यश ढाका खून प्रकरणातील मास्टरमाइंडवर गुन्हा दाखल करा

प्रजापत्र | Friday, 31/10/2025
बातमी शेअर करा

बीड दि.३१(प्रतिनिधी): यश ढाका खून प्रकरणातील मास्टरमाइंड असलेल्या गणेश शिराळे याच्यावर गुन्हा दाखल करून त्याला तात्काळ अटक करण्यात यावी यासह इतर मागण्यांसाठी आज जिल्हा पोलीस अधिक्षक कार्यालयासमोर यश ढाका याच्या नातेवाईकांकडून आंदोलन करण्यात येत आहे.  
    गेल्या काही महिन्यांपूर्वी यश ढाकाचा खून करण्यात आला. या प्रकरणातील मास्टरमाइंड गणेश शिराळे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा व त्यास अटक करण्यात यावी, घटनास्थळी हजर असणारे व आरोपींना मदत करणार्‍यांना सह आरोपी करावे, प्रकरण फास्टट्रॅक कोर्टात चालविण्यात यावे, सर्व आरोपींची नार्को टेस्ट करण्यात यावी आदी मागण्यांसाठी शुक्रवार (दि.३१) रोजी जिल्हा पोलीस अधिक्षक कार्यालयासमोर यश ढाका यांचे कुटुंबिय आंदोलन करत आहेत
.  

Advertisement

Advertisement