गेवराई दि.२९ (प्रतिनिधी):तालुक्यातील (Gevrai) तलवाडा येथून एका २५ वर्षीय तरुणाचे अज्ञात दोघांनी चारचाकी गाडीतून अपहरण केल्याची घटना मंगळवार (दि.२८) रोजी सकाळी ११:०० च्या सुमारास घडली असून तलवाडा पोलीस ठाण्यात अज्ञात दोघांविरोधात गुन्हा (Crime)दाखल करण्यात आला आहे.
गेवराई (Gevrai) तालुक्यातील राजापूर येथील कांतीलाल मारोती गर्जे (वय ४५) यांचा मुलगा किशोर कांतीलाल गर्जे (वय २५) याला तलवाडा येथील तुकाई क्लीनीक येथून अज्ञात दोघांनी चारचाकी गाडीतून अपहरण केल्याची घटना भरदिवसा मंगळवार (दि.२८) रोजी सकाळी ११:०० च्या सुमारास घडली असून तलवाडा पोलीस ठाण्यात अज्ञात दोघांविरोधात कांतीलाल गर्जे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला (Police)असून घटनेचा पुढील तपास पोउपनि अन्नलदास हे करत आहेत.
बातमी शेअर करा

