बीड दि.१८(प्रतिनिधी):शहरातील (Beed)माने कॉम्पलेस परिसरातील उद्यानाकडे पायी जात असताना एका महिलेच्या गळ्यातील मिनिगंठन दुचाकीस्वारांनी लंपास केल्याची घटना शुक्रवार (दि.१७)रोजी सायंकाळी ५ च्या सुमारास घडली असून अज्ञात दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बीड (Beed)शहरातील सुनंदा अरुण जगताप (वय ५४) रा.शाहूनगर बीड ह्या नातवंडांसोबत माने कॉम्पलेस परिसरातील उद्यानाकडे पायी जात असताना समोरून दुचाकीवर आलेल्या अज्ञात दोघांनी गळ्यातील १३ ग्रॅमचे मिनिगंठन हिसकावून घेऊन (Crime)गेल्याची घटना शुक्रवार (दि.१७)रोजी सायंकाळी ५ च्या सुमारास घडली असून एकूण ७५,००० रुपयांचा ऐवज लंपास केल्याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात अज्ञात दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बातमी शेअर करा

