Advertisement

तीन वर्षांच्या चिमुरडीचा आढळला मृतदेह

प्रजापत्र | Thursday, 11/09/2025
बातमी शेअर करा

बीड दि.११ (प्रतिनिधी):  रामगड परिसरात एका तीन वर्षीय चिमुकलीला गळफास दिलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आल्यानं खळबळ उडाली. दोन दिवसांपूर्वीच या चिमुकलीच्या वडिलांनी इमामपूर रोड परिसरात झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला होता. हा सर्व प्रकार कौटुंबिक कारणावरून झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविला जातो आहे. दोन दिवसांपूर्वी वडील आणि आज सकाळी मुलीचा मृतदेह लिंबाच्या झाडाला आढळून आला. या घटनेनं बीडमध्ये खळबळ उडाली आहे.

 

     अधिक माहितीनुसार, बीड (Beed)जवळील रामगड परिसरात एका तीन वर्षीय चिमुकलीचा गळफास दिलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आला. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली. दोन दिवसांपूर्वी याच मुलीच्या वडिलांचा मृतदेह इमामपूर रोड परिसरात गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला होता.जयराम बोराडे असे मयत झालेल्या त्या चिमुरडीच्या वडिलांचे नाव आहे. जयराम बोराडे यांच्यासोबत त्यांची तीन वर्षांची मुलगी घरातून बाहेर निघाली असल्याचे सांगण्यात आले होते. (Beed missing) वडील गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळले मात्र सोबत असलेली चिमुरडी नेमकी गेली कुठे याचा शोध सुरू होता. अचानक आज सकाळी रामगड परिसरात एका झाडाला गळफास दिलेल्या अवस्थेत तिचा मृतदेह आढळून आला आहे.या परिसरात मॉर्निंग वॉकला गेलेल्या तरुणांना एका लिंबाच्या झाडाला या चिमुकलीचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आला. त्यानंतर तात्काळ पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेतला आणि शवविच्छेदनासाठी पाठवला आहे.या दुहेरी मृत्यूच्या घटनेने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असल्याचे पाहवयास मिळत आहे तर ही घटना नेमकी कशामुळे घडली असेल याचा सखोल तपास आता बीड (Beed police)ग्रामीण पोलिस ठाण्याचे पोलिस करत आहेत.

Advertisement

Advertisement