बीड: बीडचे माजी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक थोरात यांचे निलंबन मागे घेण्याची घटना सकाळी घडल्यानंतर आता बीडचे आणखी एक माजी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुरेश साबळे यांची बीड जिल्ह्यात बदली झाली आहे. सध्या रायगड येथे असलेल्या डॉ. सुरेश साबळे यांना माजलगावच्या उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक म्हणून नियुक्ती देण्यात आली आहे.
बीडचे जिल्हा शल्यचिकित्सक राहिलेले डॉ. सुरेश साबळे यांची रायगड जिल्ह्यात बदली झाली होती. आता त्यांना पुन्हा माजलगाव येथे नियुक्ती देण्यात आली आहे. डॉ. सुरेश साबळे यांची बीडचे सीएस म्हणून कारकीर्द वादळी आणि लक्षणीय राहिली होती.
बातमी शेअर करा