Advertisement

किरकोळ वादातून हाणामारी

प्रजापत्र | Monday, 25/08/2025
बातमी शेअर करा

 अंबाजोगाई दि.२५ (प्रतिनिधी) : गुरुवारपेठेत (Ambajogai) दोन दिवसांपूर्वी झालेल्या किरकोळ कारणावरून पेटलेल्या वादाचे पर्यवसान मोठ्या भांडणात होऊन हाणामारी झाली. त्यानंतर दोन्ही बाजूंनी एकमेकांविरुद्ध मारहाण व जिवे मारण्याची (Crime) धमकी दिल्याच्या तक्रारी दाखल केल्या. या प्रकरणी अंबाजोगाई शहर पोलिसांनी परस्परविरोधी गुन्हे नोंदवले आहेत.

        शिवसंदेश जनार्धन राऊत यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, (दि.२४) रोजी रात्री१०.३० वाजता सौरभ सुरवसे, संस्कार सुरवसे, दिनेश सुरवसे व सागर सुरवसे हे चौघेजण त्यांच्या घरी आले. वादाच्या कारणावरून त्यांनी शिवानंद वाघाळकर याला विट मारली तसेच फिर्यादी राऊत, त्यांचे भाऊजी संजय शिंदे व रोहित शिंदे यांना काठीने मारहाण केली. यावेळी शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिली. यावरून चौघांविरुद्ध (Ambajogai) गुन्हा दाखल झाला. दरम्यान, याच घटनेत दुसऱ्या बाजूने सौरभ सुरवसे याने पोलिसात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार, ते आपल्या आईवडील व नातेवाईकांसह रोहित शिंदे यांच्या घरी गेले असता बोलाबोली व शिवीगाळ झाली. यावेळी बबलु राऊत याने सौरभ याच्या डोक्यात कोयत्याने वार केला, रोहित शिंदे याने बॅटने मारहाण केली, तर शिवानंद वाघाळकर याने सागर सुरवसे याला दगड मारला. तसेच तारामती सुरवसे यांनाही मारहाण झाल्याचे तक्रारीत नमूद आहे. या आधारावर रोहित शिंदे, बबलु राऊत व शिवानंद वाघाळकर (Crime)यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांनी दोन्ही बाजूंच्या परस्परविरोधी फिर्यादीवरून गुन्हे नोंदवून तपास सुरू केला आहे.

Advertisement

Advertisement