Advertisement

चोरटयांनी दुचाकी केली लंपास 

प्रजापत्र | Tuesday, 06/05/2025
बातमी शेअर करा

 माजलगाव दि.६(प्रतिनिधी):पात्रुड (Majalgaon) येथील जनावरांच्या दवाखान्या समोर लावलेली दुचाकी अज्ञात चोरटयांनी लंपास केल्याची घटना (दि.२) शुक्रवार रोजी घडली असून अज्ञात चोरट्याविरुद्ध माजलगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा (Majalgaon police) दाखल करण्यात आला आहे. 

         जिल्हाभरात (Beed)घरफोडी,लूटमार अश्या घटनेत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे.अश्यातच (Majalgaon) माजलगाव तालुक्यातील राम माणिक गवळी (वय २९)रा.आनंदगाव ता.माजलगाव यांची काळ्या रंगाची हिरो स्प्लेंडर क्र.एमएच ३८ एबी ३५४८ अंदाजे किंमत ३०,००० रुपये किमतीची दुचाकी पात्रुड येथील जनावरांच्या दवाखान्या समोर लावलेली होती ती अज्ञात चोरटयांनी लंपास केल्याची घटना  (दि.२) शुक्रवार रोजी घडली असून राम गवळी यांच्या फिर्यादीवरून (दि.५) सोमवार रोजी अज्ञात चोरट्याविरुद्ध  माजलगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास माजलगाव (Majalgaon gramin police) ग्रामीण पोलीस करत आहेत. 
 

Advertisement

Advertisement