औसा : येथील सामाजिक कार्यकर्त्या प्रियंका लद्दे यांची राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या जिल्हाअध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे. खा सुप्रिया सुळे यांच्या हस्ते व महिला प्रदेशाध्यक्ष रूपाली चाकणकर आणि युवती प्रदेशाध्यक्ष सक्षणा सलगर यांच्या उपस्थितीत त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले .
प्रियंका लद्दे मागच्या अनेक वर्षांपासून समाजकारणात आहेत. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांचे शिक्षण करणे, गरजूंच्या मदतीला धावून जाणे ही त्यांची स्वभाववैशिष्ट्ये . सण उत्सवांमध्ये समाजातील सर्व घटकांना सहभागी करून घेण्याचे उपक्रम त्यांनी अनेकदा राबविले.याची दखल घेत राष्ट्रवादी काँग्रेसने राष्ट्रवादी युवती जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती केली आहे.
औशाचे नगराध्यक्ष डॉ अफसर शेख यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या.
बातमी शेअर करा

