मुंबई - काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांची विधानसभेत नवे विरोधी पक्षनेते म्हणून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आज (दि.३) घोषणा केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि काँग्रेसचे गटनेते बाळासाहेब थोरात यांनी त्यांना विरोधी पक्षनेते पदाच्या आसनावर बसवले. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर विरोधी पक्ष नेतेपदावर काँग्रेसने दावा केला होता. विजय वडेट्टीवार यांचे नाव विरोधी पक्षनेते पदासाठी प्रस्तावित करावे, असे काँग्रेस हायकमांडने बाळासाहेब थोरात यांना कळवले होते. आज त्यांच्या नावाची विधानसभेत घोषणा करण्यात आली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वडेट्टीवार यांचे अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या.
बातमी शेअर करा

