शिरूर कासार दि.३० (प्रतिनिधी):तालुक्यातील हिवरसिंगा परिसरात भरधाव टेम्पोने दुचाकीस्वारांना मंगळवार (दि.२९) रोजी रात्री जोराची धडक दिली यात दोन सख्या भावांसह मामाचा जागीच मृत्यू झाला.
बीड-शिरूर-पाथर्डी रोडवर सतत अपघाताची मालिका सुरूच असून हिवरसिंगा परिसरात बीडकडून भरधाव येत असलेल्या एमएच २३ एम व्ही ६०२३ या क्रमांकाच्या टेम्पोने दुचाकीला जोराची धडक दिली.या भीषण अपघातात दुचाकी वरील राम शेळके (वय 25) रा.शिरूर,मंगेश रोहिदास बजगुडे (वय 16),गणेश रोहिदास बजगुडे (वय 21) दोघे रा.गोरे वस्ती,बालेपीर बीड या दोन सख्या भावांसह मामाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना मंगळवार (दि.२९) रोजी रात्री 12:30 ते 1 च्या सुमारास घडली असून टेम्पो चालक घटनास्थळावरून पसार झाला.
बातमी शेअर करा

