मुंबई : राज्याच्या राजकीय वर्तुळात गेल्या काही दिवसांपासून दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची चर्चा सुरू आहे. गाठीभेटी, चर्चा, बैठका या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवरती विलिनीकरणासंदर्भात वेगवेगळे दावे करण्यात येत होते. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांकडून वेगवेगळे दावे, वक्तव्ये करण्यात येत होती. अशातच दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाबाबत आणि एनडीएसोबत सत्तेत जाण्याच्या चर्चांवरती राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्याध्यक्षा आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी आज पत्रकार परिषद (Supriya Sule)घेऊन सविस्तरपणे भाष्य केलं आहे. यावेळी सुळे म्हणाल्या, एनडीए सोबत जाण्याची चर्चा नाही. जिथे चर्चा नाही तिथ कॉमा, फुलस्टॉप विषय येत नाही. एसए लिहिला नाही तर त्याबाबत का बोलायचं? अशा शब्दात विलीनीकरणाच्या चर्चांना फुलस्टॉप लावला आहे.
पुढे बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, विलीनीकरणाच्या चर्चांचा मला आता कंटाळा आला आहे. माझा भाऊ (अजित पवार) होता तोपर्यंत विलिनकरणाची चर्चा होती, तारीखही ठरली होती. ज्या दिवशी माझा भाऊ गेला, त्या दिवशी विलीनीकरणाबाबत माझ्या मनात, माझ्या पक्षात फुल स्टॉप झाला, ज्या दिवशी संघटनेतील पदाधिकारी आणि माझा अजितदादा यांच्याशी चर्चा झाली होती. त्याचे व्हिडीओ पण तुम्ही दाखवले. माझा भाऊ होता तोपर्यंत विलीनीकरणाची चर्चा होती. ज्या दिवशी भाऊ गेला त्या दिवशी विलीनीकरणाला फुल स्टॉप झाला.

