चकलांबा दि.७(वार्ताहर):शिरूर कासार तालुक्यातील मार्करवाडी शिवारातील सिंदफना नदी पात्रातून ट्रॅक्टरच्या साहाय्याने अवैध वाळूची वाहतूक होत असल्याची माहिती चकलांबा पोलिसांना मिळताच सोमवार (दि.७) रोजी सकाळी ५:४५ च्या सुमारास कारवाई करत ३,५०,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून ट्रॅक्टर चालकाविरुद्ध (Chaklamba Police) चकलांबा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बीड (Beed)जिल्हयात मागील काही दिवसांपासून अवैध वाळू वाहतुकीवर पोलिसांनी कारवाईचा सपाटा सुरु केला असून शिरूर कासार तालुक्यातील मार्करवाडी शिवारातील सिंदफना नदी पात्रातून ट्रॅक्टरच्या साहाय्याने अवैध वाळूची वाहतूक करताना हनुमंत रामभाऊ काशीद (वय ५४) रा.फुलसांगवी यांच्यावर चकलांबा पोलिसांनी सोमवार (दि.७) रोजी सकाळी ५:४५ च्या सुमारास कारवाई केली. यात विना नंबरचे जॉन डिअर कंपनीचे ट्रॅक्टर अंदाजे किंमत ३,००,००० रुपये व निळ्या रंगाची दोन चाकी ट्रॉली अंदाजे किंमत ५०,००० रुपये असा एकूण ३,५०,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून पुढील तपास (Chaklamba Police) चकलांबा पोलीस करत आहेत.