Advertisement

विहिरीत पडून अकरा वर्षीय मुलीचा मृत्यु

प्रजापत्र | Monday, 30/06/2025
बातमी शेअर करा

घाटनांदूर दि.३० (वार्ताहर): विहिरीतून पाणी आणण्यास गेलेल्या एका अकरा वर्षाच्या मुलीचा पाय घसरून विहिरीत पडल्याने मृत्यु झाल्याची घटना सोमवार (दि.३०)रोजी दुपारी बाराच्या सुमारास घडली आहे.
       राजू गुंजकर रा. सावरगाव मुंडे ता.लोणार जि. बुलढाणा हे आपल्या कुटुंबासह दगड पाडण्यासाठी घाटनांदूर गावा लगत वास्तव्य करत होते.  सोमवार (दि.३०) रोजी त्यांची मुलगी रेणुका गुंजकर (वय११) हि पाणी आणण्यासाठी लगत असलेल्या शेतातील विहिरीत गेली होती. रेणुकाचा पाय घसरून तोल गेल्याने विहिरीच्या पाण्यात पडून मृत्यु झाला. अंबाजोगाई ग्रामीण पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Advertisement

Advertisement