मुंबई : महाराष्ट्रात हिंदी भाषा सक्तीविरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. कुणी, कितीही प्रयत्न केला तरी महाराष्ट्रात हिंदी सक्ती लादू देणार नाही, असा इशारा उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी (दि.२६ जून) दिला.
त्यांनी पत्रकार परिषद घेत, सर्वांनी पक्षभेद विसरुन हिंदी सक्तीविरोधातील आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन केले. जोपर्यंत ही सक्ती मागे घेतली जात नाही तोपर्यंत आंदोलन सुरु राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले.हिंदी सगळ्यांना येते. आम्ही इतर भाषेचा द्वेष करत नाही. पण हिंदी सक्ती लादून घेणार नाही. आमचा हिंदी भाषेला विरोध नाही. पण हिंदी सक्तीला विरोध आहे. हे दळण कशासाठी दळताय? असा सवाल त्यांनी राज्य सरकारला केला.
बातमी शेअर करा