Advertisement

गुजरातमध्ये भिषण विमान अपघात

प्रजापत्र | Thursday, 12/06/2025
बातमी शेअर करा

: गुजरातच्या अहमदाबादमध्ये मोठा विमान अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. अहमदाबाद येथे विमान कोसळून हा अपघात झाला आहे. अहमदाबादमधून या विमान अपघाताचे भयावह फोटो आणि व्हिडीओही समोर येत आहेत. विमान अपघातानंतर अहमदाबादच्या मेघानी परिसरात आगीच्या मोठ्या ज्वाळा दिसत आहे. तसेच दूरवरून काळ्या धुराचे ढग दिसत आहेत. हे एक प्रवासी विमान होते.गुजरातमधील अहमदाबादमध्ये २४२ प्रवाशांसह एअर इंडियाचे विमान कोसळले, अशी माहिती राज्य पोलिस नियंत्रण कक्षाने दिली आहे. सुरुवातीच्या माहितीनुसार, विमानाला उड्डाणादरम्यान अपघात झाला.

Advertisement

Advertisement