अंबाजोगाई दि.२९(प्रतिनिधी): शहरातील (Ambajogai) बस स्थानकावर आज (दि.२९) गुरुवार रोजी सकाळी भीषण अपघात झाला आहे. या अपघातामध्ये एस.टी.बसच्या खाली येऊन एक तरुण चिरडून त्याचा जागीच मृत्यु झाला.
मयत तरुणाचे नाव अंकुश मोरे रा. धानोरा बु., ता.अंबाजोगाई असे आहे. (Accident)बस स्थानकाच्या पश्चिम प्रवेशद्वाराने आतमध्ये प्रवेश करत असताना एमएच १४. एमएच १७०१ या क्रमांकाच्या एस.टी.बसने अंकुश यांस चिरडले. अपघातानंतर त्यांना गंभीर अवस्थेत स्वाराती रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच त्यांचा मृत्यु झाला असल्याची माहिती मिळाली आहे. या प्रकरणी पुढील तपास अंबाजोगाई पोलीस करत आहेत.
बातमी शेअर करा