धाराशिव दि.6 (प्रतिनिधी) - १ नोव्हेंबर २००५ पूर्वी अंशतः अनुदानित कायम आस्थापनेवरील नियमित वेतनश्रेणीतील व त्यानंतर १०० अनुदान प्राप्त खाजगी प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा तसेच तुकड्यावरील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना ध्येय १९८२ ची जुनी पेन्शन योजना नियमित लागू करावी या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन समन्वय संघाच्यावतीने शिक्षक दिनीच काळ्याफिती लावून शिक्षकांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर दि.५ सप्टेंबर रोजी धडक मोर्चा काढला.
१ नोव्हेंबर २००५ पूर्वी नियुक्त असणारे सर्व कर्मचारी १९८२ ची जुनी पेन्शन योजना लागू होण्यास पात्र व त्याचे हकदार आहेत. शासन राजपत्र व शासन निर्णय वित्त विभाग दि.३१ ऑक्टोबर २००५ रोजी किंवा त्यानंतर राज्य शासनाच्या सेवेत नियुक्त होणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांसाठी नवीन परिभाषिक अंशदान निवृत्ती वेतन योजना सुरू केली आहे. शासन निर्णय वित्त विभाग दि.१९ जुलै २०११ नुसार १ नोव्हेंबर २००५ पूर्वी करार पद्धतीने मानधनावर शिक्षण सेवक कृषी सेवक ग्रामसेवक पदावर रुजू होऊन व त्यानंतर कायम सेवेत आलेल्या कर्मचाऱ्यांना जुनी १९८२ ची पेन्शन योजना लागू केलेली आहे. शासन निर्णय वित्त विभाग दि.२ फेब्रुवारी नुसार १ नोव्हेंबर २००५ पूर्वी पदभरती जाहिरात, अधिसूचना झालेल्या प्रकरणी शासन सेवेत १ नोव्हेंबर २००५ पूर्वी किंवा त्यानंतर रुंदी झालेल्या शासकीय अधिकारी कर्मचारी यांना केंद्र शासनाच्या धर्तीवर जुनी निवृत्तीवेतन योजना लागू करण्यात आली आहे. राज्याच्या शैक्षणिक धोरणामध्ये अनेक सकारात्मक निर्णय घेऊन शैक्षणिक गुणवत्ता वाढीचे उल्लेखनीय काम केले आहे. महाराष्ट्रातील २६ हजार पेन्शन पीडितांना सुस्पष्ट शासन आदेश पारित करून न्याय द्यावा. मानवतावादी दृष्टिकोनातून सकारात्मक सहानुभूतीपूर्वक विचार करून जिल्ह्यातील ७०० पेक्षा जास्त अन्यायग्रस्त कर्मचाऱ्यांना व मयत कर्मचाऱ्यांच्या वारसांना जुनी निवृत्ती वेतन योजना म्हणजेच महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्ती वेतन) नियम १९८२ व निवृत्तीवेतनाचे अंश राशीकरण नियम १८८४ व सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधी योजनेचे लाभ लागू करून त्यांच्या भविष्यातील उदरनिर्वाह चा न्यायिक प्रश्न मार्गी लावावा आदी मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला. यावेळी संस्था चालक संघटना अध्यक्ष सुधीर पाटील, बालाजी तांबे, विमल घोटकर, संभाजी वीर, एस आर आवारे, एस एन देशमुख, एस एन साठे, पी के जाधवर, डीजी सुर्यवंशी, सी बी काळे,
एल वाय भांगे, एम जी मुल्ला, ए एस घोसले, ए व्ही कांबळे, पी के देशमुख, के ए शेख, एस व्ही बिराजदार, वैभव वीर, पी बी जाधव, बी एस गव्हाळे आदींसह शिक्षक शिक्षिका मोठ्या संख्येने काळात किती लावून या मोर्चामध्ये सहभागी झाल्या होत्या. हा मोर्चा लेडीज क्लब येथून डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळा, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला.

