मुंबई: राज्यातील व्यावसायिक वाहनांना ‘३८ अ’ अंतर्गत दिल्या जाणाऱ्या फिटनेस सर्टिफिकेट प्रक्रियेत झालेल्या कथित गैरव्यवहाराने परिवहन विभागात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणाच्या चौकशीअंती तब्बल ७३५ आरटीओ अधिकारी आणि निरीक्षकांचा समावेश असल्याची माहिती समोर आली आहे. या अधिकाऱ्यांची यादी असलेला चौकशी अहवाल परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे सादर करण्यात आला आहे.
‘वाहने राज्यातच, फिटनेस परराज्यात’ या वृत्तातून हा प्रकार समोर आल्यानंतर परिवहन विभागाने सात सदस्यीय चौकशी समिती स्थापन केली होती. समितीने केलेल्या चौकशीनंतर मोटार वाहन निरीक्षक, सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी आणि उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अशा एकूण ७३५ अधिकाऱ्यांची नावे अहवालात नमूद करण्यात आली आहेत.
बातमी शेअर करा

