जालना: जिल्ह्यातील अंतरवली सराटीमध्ये मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून मराठा आंदोलक मनोज जरांगे (Manoj Jarange )यांनी आंदोलनाची हाक दिली आहे. २९ ऑगस्टला होणाऱ्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर अंतरवाली सराटीमध्ये अभ्यासकांसोबतच्या बैठकीच आयोजन करण्यात आलं होतं. या बैठकीमध्ये सरकारसमोर मांडलेल्या आधीच्या मागण्या आणि त्या संबंधित कायदेशीर माहिती विषयी चर्चा झाली. या सोबतच सरकारने दिलेल्या एसओपी संदर्भात देखील चर्चा झाल्याची माहिती आहे. यावेळी बोलताना मनोज जरांगे यांनी २९ ऑगस्टला होणाऱ्या अनोदालनात जीव गेला तरी चालेल पण आंदोलनावर ठाम असल्याचा निर्धार केला आहे. अभ्यासकांसोबतच्या बैठकीत मनोज जरांगेंनी चर्चा करून पुढील आंदोलनाची दिशा ठरवली आहे. दरम्यान, सरकारने काढलेल्या जीआरमध्ये चुका असल्याचं मान्य करावं, आणि त्यात सुधारणा करावी, अशी मागणीही यावेळी त्यांनी केली आहे.

बातमी शेअर करा
