दिल्लीत नीट परीक्षा आणि शिक्षण व्यवस्थेतील सुधारणांसाठी आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीमाराचे तीव्र पडसाद आता महाराष्ट्रात उमटू लागले आहेत. पोलिसांच्या या अमानुष कारवाईचा आणि दडपशाहीचा निषेध नोंदवण्यासाठी 'वंचित बहुजन आघाडी'ने येत्या २३ जुलै रोजी 'महाराष्ट्र बंद'ची हाक दिली आहे. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी ही घोषणा केली आहे.
बातमी शेअर करा

