Advertisement

अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुणीचा मृत्यु 

प्रजापत्र | Sunday, 20/09/2026
बातमी शेअर करा

 वडवणी दि.२०(प्रतिनिधी):पुण्याला शिक्षणासाठी जाण्यासाठी निघालेल्या २० वर्षीय तरुणीचा अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्यू झाला, तर तिचे वडील या अपघातात गंभीर जखमी झाले आहेत. रोहिणी महादेव नाईकवाडे (वय २०, रा. देवडी, ता. वडवणी असे मृत तरुणीचे नाव आहे.
अधिक माहितीनुसार, रोहिणी ही पुण्यात शिक्षण घेत होती. शनिवारी रात्री देवडी येथून पुण्याला जाणाऱ्या ट्रॅव्हल्स पकडण्यासाठी ती तिच्या वडिलांसोबत मोटारसायकलवरून वडवणीकडे जात होती.दरम्यान, रात्री ९:३० च्या सुमारास रस्त्यात अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात रोहिणी अत्यंत गंभीर जखमी झाली, तर तिचे वडीलही जखमी झाले. घटनेनंतर गंभीर अवस्थेत रोहिणीला तातडीने जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात येत असताना,वाटेतच तिचा मृत्यू झाला. तर तिच्या वडिलांवर सध्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आज रविवार (दि.२०)रोजी सकाळी ८:३० च्या सुमारास मृत रोहिणीच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले.या घटनेमुळे देवडी परिसरावर शोककळा पसरली असून पोलीस या अपघाताचा पुढील तपास करत आहेत.

Advertisement

Advertisement