Advertisement

अंबाजोगाईच्या दोन विद्यार्थ्यांची नीट प्रकरणात चौकशी

प्रजापत्र | Thursday, 21/05/2026
बातमी शेअर करा

अंबाजोगाई दि.२१(प्रतिनिधी): देशभरात प्रचंड खळबळ उडवून देणाऱ्या NEET (वैद्यकीय पात्रता परीक्षा) पेपर फुटी प्रकरणाचे धागेदोरे आता बीड जिल्हा-सह अंबाजोगाईत पोहोचल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. केद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) बुधवारी अंबाजोगाई शहरातील गुरुवार पेठ भागातील एकाच घरातील दोन विद्यार्थी आणि पालकांची चौकशी केली आहे. दोन संशथित विद्यार्थ्याची तब्बल दोन तास कसून चौकशी केली. विशेष म्हणजे या दोन विद्यार्थ्याना आणि त्यांच्या पालकांना घरातून बाहेर दुसऱ्या ठिकाणी घेऊन जातं ही चौकशी करण्यात आली. या घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात आणि शैक्षणिक वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

Advertisement

Advertisement