Advertisement

अभ्यासाच्या तणावातून विद्यार्थिनीची आत्महत्या

प्रजापत्र | Saturday, 11/04/2026
बातमी शेअर करा

 अंबाजोगाई दि.११(प्रतिनिधी): येथील सावता माळी चौक परिसरात राहणाऱ्या १७ वर्षीय पूनम मेघराज दहिफळे या बारावीच्या विद्यार्थिनीने अभ्यासाच्या तणावातून गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना शनिवार (दि.११) रोजी सकाळी उघडकीस आली आहे.
      मूळची धारुर तालुक्यातील उमरेवाडी येथील असलेली पूनम शिक्षणासाठी अंबाजोगाईत वास्तव्यास होती. शुक्रवारी १० एप्रिल रोजी रात्री तिने राहत्या घरात सीलिंग फॅनला गळफास घेतला, ज्याची माहिती शनिवारी सकाळी समोर आली. या हृदयद्रावक घटनेमुळे परिसरात मोठी हळहळ व्यक्त होत आहे. पूनम तिचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी लहान भाऊ आणि आजीसोबत अंबाजोगाईत राहत होती, तर तिचे वडील नोकरीनिमित्त पुण्यात असतात. प्राथमिक माहितीनुसार, परीक्षेच्या आणि अभ्यासाच्या दडपणामुळे तिने हे टोकाचे पाऊल उचलल्याची प्राथमिक माहिती आहे. अंबाजोगाई शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी स्वाराती रुग्णालयात पाठवला असून या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहेत.

Advertisement

Advertisement